शिक्षण कसे असावे...

शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विधमान आहे, त्याचे प्रकटीकरण.

- स्वामी विवेकानंद

img

आदर्श शिक्षणाची पंचसूत्री

करण

पालकांची कृति,
पाल्यांचे अनुकरण.

ग्रहण

कृतीतून आलेल्या अनुभवांची साठवणूक.

धारण

अनुभवांच्या साठवणुकीतून वागणुकीत अंगीकारण.

मनन

आंगीकारलेल्या गोष्टीत कल्पकतेनं
भर घालणं.

क्षेपण

स्वता:ची विशिष्ट
अशी ओळख
निर्माण करणं.

img

करण

पालकांची कृती, पाल्यांचे अनुकरण.

करण म्हणजे काय?


 • करण हा शिक्षणाचा पहिला टप्पा होय.
 • करण म्हणजे यातून मुल कृती करायला शिकतं.
 • करण म्हणजे पालकांचं निरीक्षण करून त्यांचं अनुकरण करणं.
 • करण म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्वत: अनुभव घेणं.

ग्रहण

कृतीतून आलेल्या अनुभवांची साठवणूक.

ग्रहण म्हणजे काय?


 • ग्रहण हा शिक्षणाचा दुसरा टप्पा होय.
 • ग्रहण म्हणजे संग्रह करणं.
 • ग्रहण म्हणजे कृतीतून आलेले अनुभव जमवणं.
 • ग्रहण म्हणजे व्यक्तींच्या, परिस्थितींच्या निरीक्षणातून अनेक गोष्टी साठवणं.
 • ग्रहण म्हणजे आपले विचार, मत न मांडता शांतपणे गोष्टी समजून घेणं.
img
img

धारण

अनुभवांच्या साठवणुकीतून वागणुकीत अंगीकारण.

धारण म्हणजे काय?


 • धारण हा शिक्षणाचा तिसरा टप्पा होय.
 • धारण म्हणजे यातून मूल आत्मसात करायाला शिकतं.
 • धारण म्हणजे अनूभवातून आलेल्या गोष्टी स्वीकारुन त्या आपल्या वागाणुकीत अंगीकारणं.
 • धारण म्हणजे कुठल्याही परिस्थितीतील गोष्टी आपल्याशा करणं.

मनन

आंगिकारलेल्या गोष्टीत कल्पकतेनं भर घालणं.

मनन म्हणजे काय ?


 • मनन म्हणजे हा शिक्षणाचा चौथा टप्पा होय.
 • मनन म्हणजे यातून मुल स्वत:च्या ज्ञानात कल्पकतेनं भर घालायाला शिकतं.
 • मनन म्हणजे व्यक्तीची सदविवेक बुध्दी.
 • मनन म्हणजे अनुभवातून मिळालेलं ज्ञान आपल्या हृदयात खोलवर रुजवणं.
 • मनन म्हणजे मनात खोलवर रुजलेल्या गोष्टीचं प्रतीबिंबच होय.
img
img

क्षेपण

स्वता:ची विशिष्ट अशी ओळख निर्माण करणं.

क्षेपण म्हणजे काय ?


 • क्षेपण शैक्षणिक प्रक्रियेचा शेवटचा व महत्वाचा टप्पा होय.
 • क्षेपण म्हणजे करण , ग्रहण, धारण व मनन यांचा एकत्रित परिणाम.
 • क्षेपण म्हणजे यातुन मुळ कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वसानं सादरीकरण करूण स्वत: ची विशिष्ट अशी ओळख निर्माण करतं.
 • क्षेपण म्हणजे स्वत: ला व्यक्त करणं, संपादीत ज्ञानाच्या आधारे आत्मविश्वसानं जगाला सामोर जाणं.