मनावरचे ताणतणाव जादू वाटावी असे खेळामुळे नाहीसे होतात. ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे दुबळे मन. मन दुबळे झाले की शरीराची शक्तीही आपोआपच क्षीण व्हायला लागते. आत्मविश्वास खचतो आणि माणूस नैराश्याचा शिकार बनतो. कोणताही खेळ अत्यंत प्रभावी असा निराशेवरचा आणि ताणतणावरचा उतारा आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते व त्यामुळे नैराश्याला ताणतणावाला तोंड देण्याची उभारी मनाला येते. खेळ खेळण्याने नव्हे तर चांगला प्रेक्षक बनल्याने सुद्धा ताणतणाव नाहीसे होतात. खेळाडूने जेव्हा शक्य असेल तेव्हा स्पर्धेत उतरायचे असते कारण आपली पातळी ठरवण्याचा तो एकच मार्ग असतो. एक गोष्ट सतत ध्यानात ठेवायला हवी, ती म्हणजे स्पर्धा ही आपल्या भावंडांबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर ,आपल्या मित्रांबरोबर आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतः बरोबर असते. आणि स्पर्धा संपल्याबरोबर जिंकण्याचा आणि हारणार्याो खेळाडूंनाही एकमेकांशी हस्तांदोलन करायचे असते. खेळातील चुरस खेळ संपल्या बरोबर संपवला आली तरच खेळाचा खरा फायदा अनुभवायला मिळतो.