व्यक्तीच उमलत जाणं, त्याच घडत जाणं, हे वेगवेगळ्या माध्यमातून. माणसाला वाचणं, जगाला वाचणं मूर्त-अमूर्तातून संवाद साधणं, यासाठी सोबत पुस्तकांची
जग जवळ येते पुस्तकांच्या माध्यमातून , व्यक्ती जाणता येतात पुस्तकाच्या माध्यमातून , स्वतःला मी जाणतो पुस्तकाच्या माध्यमातून, ज्ञान संपादन, भाषाविकास, विचारांचं आदान-प्रदान, अक्षरांची मैत्री अक्षर वाड:मयातून, असे हे ओंकार वाचनालय. पुस्तकांचा अनमोल खजिना, मुलांना सहज हाताळता येईल असा.