माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. आपल्या भारतात तर ऋतूंची विविधता, प्रदेशानुसार सणांची विविधता. बदल हा जगण्याचा स्थायीभाव. हा बदल, हे जगणं हे आनंददायी व्हाव. मग आनंद हा एकएकट्याने मिळवता येत नाही, म्हणून साऱ्यांना जोडायचं, अगदी निसर्गाला, माणसांना, परमेश्वराला आणि हे उत्सव साजरे करायचे.
या उत्सव सणांमध्ये आनंद तर आहेच त्या बरोबर श्रद्धा आहे , विज्ञान आहे , जगण्याचं भान आहे. ‘केवळ जुनं तेच नाही तर जुन्यातून नवं ’ हा संगम ओंकार विद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात दिसून येतो.