शाळा सुरू होताना ‘विद्यारंभ सोहळा’ यात सरस्वतीची आराधना तर आहेच शिवाय पालकांना पालकत्वाचे भान देणारी , दिशादर्शक कार्यशाळाही आहे. आषाढी एकादशीला हे छोटे वारकरी यांच्या टाळ- चिपळ्यांच्या तालावर दिंडी त सहभागी होतात. एकत्वाचा संदेश देतात. पर्यावरण जागृती सुचवतात. याच पर्यावरणाच्या रक्षणासाठी भावा सोबत रोपांना, झाडांना ही राखी बांधतात. स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी नवरात्री साजरी करतात. या सगळायची जाणीव ठेवणारा जागरूक पालक वर्ग शिक्षक आणि विश्वास्तांसाठी कोजागिरी पोर्णिमा चे आयोजन करतो. ज्ञानाचा दीप सतत तेवत ठेवणार्याण विद्यालयात गोड आणि खमंग फराळचा आस्वाद घेत दिवाळी साजरी केली जाते.
होलीका दहनात दुर्गुणांचा नाश करून स्वत:तील सूप्त गुणांची उधळण करत सप्त रंगांची होळी साजरी केली जाते.