बालगीत : 2005-2006

नुकतेच बालवाडीतून - विद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकलेली बालके . नवे वातावरण, नव्या ताई, नवा उत्साह. एकच वर्ग त्यामुळे विविध भाषातील बालगीतांच्या गायन नृत्यांचे , बालगोपालांचे सादरीकरण.
महाराष्ट्र दर्शन : 2006-2007

आता तीस मुले , दोन इयत्ता . नवे मित्र - मैत्रिण मिळालेले, उत्साह वाढलेला. आता कुटुंबाबरोबरच समाजाची ही ओळख व्हायला लागली.
महराष्ट्राची लोक परंपरा : 2007-2008

आपण राहतो त्या भौगोलिक प्रदेशाची माहिती व्हावी. तिथले जनजीवन कळावे. या परंपरा हळूहळू समजाव्या आणि अभिमानाने ऊर भरून यावा यासाठी सप्तरंग सोहळा.
पश्चिम बंगाल : 2008-2009

कुटुंबापासून सुरू झालेला प्रवास, मी ते आम्ही कडे जाणारा , आपल्या देशाला स्वातंत्र्य देऊन गौरवान्वित
करणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास कळत वर्षभर बंगालीत १ ते १० अंक आणि काही शब्द उच्चारत साजरा झालेला सप्तरंग.
आई : 2009-2010

माझी आई ते सारे विश्वाची माऊली .' मातृत्व ' ही एक भावना, एक विचार, एक अश्वासकता. माता, भुमाता, गोमाता, गंगामाता, भारत माता ही वैश्विक संकल्पना मनात रुजवत मुलांनी सप्तरंगचा रंगमंच फुलविला.
स्वातंत्र्य समर : 2010-2011

जननी - जन्मभूमि स्वर्ग से महान है , इसके वास्ते ये तन , मन और प्राण है ||
या भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या क्रांतीकारांचा उठाव , ही क्रांतिज्वाला अखंड तेवत राहणारी , सदैव स्फुरण देणारी आणि भारताला सदैव सुरक्षित ठेवणारी ही संकल्पना गीत- नाट्य - नृत्य याने मांडली होती.
निसर्ग : 2011-2012

स्वतःचा विचार न करता केवळ देत राहणारा निसर्ग, हा दानशूर आहेच पण खूप काही शिकवणारा गुरुही आहे. माणूस हा पण निसर्गातच भाग पण त्याचा विचार करत नाही. 'निसर्गाला संसर्ग मानवाचा' ही संगीत नृत्य नाटिका मुलांनी सादर करत निसर्गाशी कायमचे नाते प्रस्थापित केले.
स्वामी विवेकानंद : 2012-2013

स्वामी विवेकानंदांचे हे १५० वे जयंती वर्ष. एका संन्याशाने संपूर्ण विश्वाला विश्वबंधुत्वाची देणगी दिली. मानवतेचा हा महापुजारी, युवकांचा आदर्श होते. यांचे जीवनचरित्र वर्षभर वाचले आणि सप्तरंग सोहळ्यात साकारले.
दशावतार : 2013-2014

जीवसृष्टीची उत्पत्ती ही पाण्यात झाली हे भारतीय संस्कृतीने दाखवल व विज्ञानालाही ते मान्य झालं. माणूस हा प्राणी असतो, पण त्याला मनुष्यत्वाकडे न्यायचं असत ' माणूस ' व्हायचं असत. पूर्ण व्हायचं असत. हा उत्क्रांतीवाद विज्ञान व संस्कृतीची सांगड घालीत दाखवला.
संस्कार: 2014-2015

संस्कार म्हणजे सम्यक कार्य अर्थात चांगली कृती. काही संस्कार नकळत असतात तर काही जाणीवपूर्वक अंगी बाणवावे लागतात. काही जन्मजात आलेले असतात. हे संस्कार रंगमंचावर तर सादर झाले. त्याचबरोबर कोणात रंगकाम तर कोणात स्वाध्याय, कोणात स्वच्छता तर कोणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचा गौरव करण्यासाठी '२१ श्री ' पुरस्कार देण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आली.
आत्मगौरव : 2015-2016

शाळेची ओळख निर्माण झाली, विद्यार्थ्यांची ओळख निर्माण झाली. ओंकार विद्यालयाची दहावीची पहिली तुकडी बाहेर पडली. 'यशस्वी भव - शुभेच्छा समारंभ' सुरू झाला. विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखावे यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले. SQOT analysis केले. या सगळ्या मंथनातून सप्तरंग सोहळा मुलांनीच उभा केला. नेपथ्य ते प्रकाश योजनेपर्यंत सर्व सांभाळले "आत्मगौरव" खऱ्या अर्थाने साकारला.
विश्वगुरू भारत भाग - 1 : 2016-2017

भारताने जगाला योग दिला, आयुर्वेद दिला, अंक दिले, संगीतातील सात सूर दिले, श्रेष्ठ काव्ये, महाकाव्य दिली. तत्वज्ञान दिले. जीवन जगण्यासाठी ' भगवद्गीता ' दिली. असा हा ' विश्वाचा गुरु - पुण्यभूमी भारत ' मुलांनी साकारला.
नृत्य - नाटकाचे रेकॉर्डिंग प्रथमच शाळेत झाले जे सप्तरंग सोहळ्यात सादर केले.
विश्वगुरू भारत भाग - 2 : 2017-2018

भारताने जगाला योग दिला, आयुर्वेद दिला, अंक दिले, संगीतातील सात सूर दिले, श्रेष्ठ काव्ये, महाकाव्य दिली. तत्वज्ञान दिले. जीवन जगण्यासाठी ' भगवद्गीता ' दिली. असा हा ' विश्वाचा गुरु - पुण्यभूमी भारत ' मुलांनी साकारला.
नृत्य - नाटकाचे रेकॉर्डिंग प्रथमच शाळेत झाले जे सप्तरंग सोहळ्यात सादर केले.
कुटुंब : 2018-2019

भारतीय कुटुंब व्यवस्था हा राष्ट्राचा भक्कम पाया. केवळ चार भिंतीत न अडकता वसुधैव कुटुंबकम ही आमची विशाल संस्कृती.
'ओंकार ' च सुद्धा एक कुटुंब. कुटुंबातील नाती- गोती, परस्पर पुरकता, गोडवा सर्वदूर पसरवा.
ओंकार एक प्रवास : 2019-2020

पाहता पाहता ओंकार विद्यालयाची सुरुवात होऊन पंधरा वर्षे झाली. वाटलं काही क्षण थबकाव, मागच्या काही सुखद क्षणापाशी रेंगाळाव, या आठवणी सर्वांसमवेत वाटाव्या- हा पंधरा वर्षांचा चढता आलेख मांडला संपूर्ण शाळेनी. संहिता लेखन, गीत, संगीत, दिग्दर्शन सार काही शाळेनी व शाळेच्याच प्रांगणात.